March 8, 2025

Rekha Gupta | कोण आहेत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता? जाणून घ्या

Rekha Gupta

Who is Rekha Gupta | दिल्लीत 27 वर्षांनी भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. रामलीला मैदानावर पार पडलेल्या कार्यक्रमात रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत. त्याआधी सुषमा स्वराज शिला दीक्षित आणि या महिला नेत्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्री पद भुषवले आहे.

1998 मध्ये दिल्‍लीच्या मुख्यमंत्रीपदी भाजपच्या सुषमा स्‍वराज होत्‍या. त्यानंतर 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन झाले आहे.

कोण आहेत रेखा गुप्ता?

रेखा गुप्ता यांचा जन्म 1974 मध्ये हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील जुलाना येथे झाला.  त्या दोन वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंबीय दिल्लीत स्थायिक झाले. कॉलेजमध्ये असतानाच त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) संपर्क त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बीकॉम आणि एलएलबीचे शिक्षण घेतले आहे.

1996-97 मध्ये त्या डूसूच्या (DUSU) अध्यक्ष झाल्या होत्या. रेखा गुप्ता यांनी 2003-2004 पर्यंत दिल्लीतील भाजप युवा मोर्च सचिवपद भूषवले. यानंतर 2004-2006 मध्ये त्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव होत्या. याशिवाय, दिल्लीतील पीतमपुरा (उत्तर) येथून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. रेखा गुप्ता या दक्षिण दिल्ली नगर निगमच्या (SDMC) महापौर देखील होत्या.

2015 आणि 2020 च्या विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता शालीमार बाग मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत त्या त्याच मतदारसंघातून विजयी होत मुख्यमंत्री झाल्या आहेत. 2025 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29,595 मतांनी पराभव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *