स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण माहिती

Chhatrapati Shivaji Maharaj Information | मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. (Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi)
मराठी बखरींनुसार त्यांचा जन्म 1627 मध्ये झाला असे म्हटले जाते. मात्र, मात्र, जेधे शकावली, कवींद्र परमानंद यांचे शिवभारत आणि राजस्थानात उपलब्ध झालेल्या जन्मपत्रिकेच्या आधारे, फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख अधिक प्रमाणित मानली जाते.
असे मानले जाते की, राजमाता जिजाऊ यांनी रयते वरती होणारा अन्याय बघून धाडसी आणि शूरवीर पुत्र होण्यासाठी शिवाई देवीला नवस केला होता. म्हणूनच जिजाऊ यांनी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले. शिवाजी महाराजांचे वडील शाहजी भोसले हे विजापूर सल्तनतीच्या सैन्यात एक मराठा सेनापती होते आणि त्यांची आई जिजाबाई या प्रतिभावान आणि हुशार होत्या. शहाजी भोसले आणि जिजाबाई यांना दोन मुले होती. त्यात मोठा मुलगा राजे संभाजी हे वडिलांसोबत असत आणि शिवाजी राजे हे जिजाबाई सोबत राहत असे.
मराठा साम्राज्य
महाराजांनी 1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. वयाच्या 16 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावरती रायरेश्वराच्या पिंडीसमोर स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. आईकडून मिळालेली शिकवण आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित केले.
तोरणा किल्ला हा महाराजांचा पहिला काबीज केलेला किल्ला होता. त्यानंतर महाराजांनी एकूण 360 किल्ले ताब्यात घेतले. रायगड किल्ल्यावर 6 जून 1974 रोजी त्यांचा भव्य राज्याभिषेक झाला, ज्यामुळे मराठा साम्राज्याला अधिकृत मान्यता मिळाली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी
छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. त्यानंतर सोयराबाई मोहिते, पुतळाबाई पालकर, सकवारबाई गायकवाड, काशीबाई जाधव आणि सगुणाबाई शिर्के यांच्यासह इतर दोन कुटुंबातील स्त्रियांसोबतही त्यांचा विवाह झाला.
सईबाईंपासून संभाजी (1657–89) आणि सोयराबाईंपासून राजाराम (1670–1700) हे दोन पुत्र झाले, तसेच त्यांना 6 कन्या होत्या. सईबाईंचे निधन 1659 मध्ये झाले, तर काशीबाई राज्याभिषेकापूर्वी (1674) मरण पावल्या. पुतळाबाई महाराजांसोबत सती गेल्या. सोयराबाईंचे निधन 1681 मध्ये संभाजींच्या कारकीर्दीत, तर सकवारबाईंचे निधन शाहू महाराजांच्या कारकीर्दीत झाले. (Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi)
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम
10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा वध केला. अफझल खान मोठ्या सैन्यासह आला असतानाही महाराजांनी चतुराईने त्याचा आणि त्याच्या सैन्याचा पराभव केला. त्यावेळी महाराजांचे वय अवघे 29 वर्षे होते, आणि या विजयाची आठवण म्हणून महाराष्ट्रात शिवप्रताप दिन साजरा केला जातो.
1660 मध्ये पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकलेल्या महाराजांनी 12-13 जुलैला निसटण्याचा प्रयत्न केला. शत्रू पाठलाग करत असताना बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीमध्ये त्यांना रोखले आणि महाराज विशाळगडावर पोहोचल्यावर तोफेचा आवाज ऐकल्यावरच प्राण सोडले. त्यानंतर त्या खिंडीला पावनखिंड असे नाव मिळाले.
शिवाजी महाराजांच्या राज्यात पुणे, मध्य व दक्षिण कोकण, जावळी आणि प्रतापगड होते. मोगलांना धक्का देण्यासाठी महाराजांनी 6 ते 9 जानेवारी 1664 रोजी सुरत लुटली. मोगल अधिकारी किल्ल्यात लपून बसले, आणि मराठ्यांनी चार दिवस शहर लुटून मोठी संपत्ती मिळवली. इंग्रज आणि डच व्यापाऱ्यांच्या वखारी सुरक्षित राहिल्या. मोगल सैन्य येत असल्याची बातमी मिळताच महाराज संपत्ती घेऊन स्वराज्यात सुखरूप परतले.
1665 मध्ये मिर्झा राजा जयसिंहने शिवाजी महाराजांचा पूर्ण कोंडमारा करून पुरंदर किल्ल्यावर हल्ला चढवला. मोगलांचा निकराचा प्रतिकार पाहून महाराजांनी राज्य आणि काही किल्ले वाचवण्यासाठी तह करण्याचा निर्णय घेतला. तहानुसार महाराजांनी 23 किल्ले मोगलांना दिले, तर 12 किल्ले आणि काही मुलूख राजनिष्ठेच्या अटीवर ठेवले. संभाजींना मोगल मनसब मिळाली. तहामुळे औरंगजेब असंतुष्ट राहिला, पण महाराजांनी कोकण आणि काही किल्ले वाचवले. पुढे, जयसिंहाच्या आग्रहावरून महाराज आग्र्याला जाण्यास तयार झाले.
1666 मध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांना दिल्लीला बोलावले, पण दरबारात अपमानित करून त्यांना आग्रा येथे कैद केले. महाराजांनी आजारी असल्याचे भासवून फळांच्या पेट्यांत लपून संभाजीसह पलायन केले. त्यांच्या जागी सरदार हिरोजी फर्जद खोलीत राहिले. 24 तासांनंतर मोगलांना महाराज ही बाब लक्षात आली. वेश बदलून महाराज मथुरेला पोहोचले आणि स्वराज्यात परतण्याआधी काही निष्ठावंतांना पाठवले. त्यांच्या अनुपस्थितीत अष्टप्रधान मंडळाने स्वराज्य व्यवस्थित सांभाळले. त्यानंतर महाराज काही दिवसांनी महाराष्ट्रात परतले.
1667 मध्ये शिवाजी महाराजांनी कोकणातील बहुतांश प्रदेश पुन्हा जिंकला आणि पोर्तुगीजांविरुद्ध बारदेशावर स्वारी केली. तहानंतर पोर्तुगीजांनी बंडखोर देसायांना आवर घालण्याचे मान्य केले. त्यांनी सप्तकोटीश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि फ्रेंचांना राजापूर येथे वखार उघडण्याची परवानगी दिली. 1669 मध्ये जंजिऱ्यावर हल्ला केला, पण मोगल, इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या मदतीमुळे तो अयशस्वी झाला. त्यानंतर औरंगजेबाच्या मूर्तिभंजन धोरणाच्या विरोधात महाराजांनी मोगलांविरुद्ध युद्ध पुकारले. (Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi)
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
शिवाजी महाराजांनी मोगलांची दुर्बल स्थिती ओळखून राज्याभिषेकाची तयारी केली. 6 जून 1974 रोजी रायगडावर वैदिक पद्धतीने राज्याभिषेक झाला आणि त्यांनी ‘क्षत्रियकुलावतंस’ व ‘छत्रपती’ ही बिरुदे धारण केली. इंग्रजांशी तह करून व्यापाराला मोकळीक दिली, पण अवास्तव मागण्या नाकारल्या. 17 जून 1674 रोजी जिजाबाईंचे निधन झाले, त्यामुळे रायगडावर दु:खाचे वातावरण पसरले. त्यानंतर तांत्रिक विधीनुसार महाराजांचा पुनश्च अभिषेक झाला.
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी मोगल इलाख्यात पुन्हा चढाया सुरू केल्या. त्यांनी जंजिऱ्याच्या सिद्दीवर आणि मुंबईच्या इंग्रजांवर दबाव टाकत विजापूरच्या कारवार भागावर स्वारी केली. विजापूरमध्ये सिद्दी खवासखान आणि पठाण बहलोलखान यांच्यात संघर्ष सुरू असल्याचा फायदा घेत त्यांनी बहादुरखानाला निष्प्रभ करून विजापूरवर हल्ला केला. फोंड्याचा किल्ला जिंकत त्यांनी आपली सत्ता अंकोल्यापर्यंत वाढवली. विजापूरमध्ये अंतर्गत यादवी सुरू असताना, पठाणांनी खवासखानाला ठार मारले आणि त्यामुळे दक्षिणी मुसलमान व पठाण यांच्यात मोठे युद्ध झाले. या गोंधळाचा फायदा घेत मोगलांनी विजापूरवर स्वारी केली, पण इंडीच्या लढाईत (१३ जून १६७६) मोगलांची मोठी हानी झाली.
1976 मध्ये शिवाजी महाराज सातारला आजारी असल्याच्या अफवा पसरल्या, तर संभाजी आणि सोयराबाई यांच्यात तणाव वाढल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, विजापूरवर हल्ला करण्यासाठी मोगलांनी बहादुरखान आणि दिलेरखानाला दक्षिणेत पाठवले, पण इंडी येथे मोगल सैन्याला मोठा फटका बसला. बहलोलखानाने मोगलांविरोधात विजापूरच्या दक्षिणी सरदारांना एकत्र केले आणि शिवाजी महाराजांकडून मदतीची अपेक्षा केली. महाराजांनी या संधीचा फायदा घेत दक्षिण भारतात मराठ्यांसाठी भक्कम आश्रयस्थान निर्माण केले.
छत्रपती शिवाजीचा महाराजांचा मृत्यू
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. फार्सी कागदपत्रांनुसार शिवाजी महाराजांचा मृत्यू रायगडावर नवज्वराच्या तापामुळे आणि रक्ताच्या उलट्यांमुळे झाला असावा, तर इंग्रज वखारींच्या कागदपत्रांमध्ये त्याला रक्ताचा अतिसार कारणीभूत असल्याचा उल्लेख आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य 50 वर्षे, 1 महिना आणि 13 दिवस इतके होते. (Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi)