March 13, 2025

सर्वात स्वस्त Apple iPhone 16e भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

iPhone 16e

Apple iPhone 16e Launched In India | Apple ने भारतीय बाजारात बहुप्रतिक्षित iPhone 16e ला लाँच केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या फोनची चर्चा सुरू होती. अखेर कंपनीने iPhone 16 मधील या नवीन एन्ट्री लेव्हल मॉडेलला सादर केले आहे. या फोनची सुरुवाती किंमत 59,900 रुपयांपासून सुरू होते. फोनमध्ये 6.1 इंच OLED स्क्रीन, 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि A18 चिप दिली आहे. या फोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया.

iPhone 16e ची वैशिष्ट्ये

iPhone 16e मध्ये 6.1 इंचाचा OLED 460ppi सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला असून रेिझॉल्यूशन 2532×1170 पिक्सल, ब्राइटनेस 1200 निट्स ब्राइटनेस आहे. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी सिरॅमिक शील्ड दिली आहे. यात 6-कोर ए18 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, यात A18 चिपचा वापर करण्यात आला आहे.

हा फोन आयओएस 18 वर काम करतो. आयफोनला पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी IP68 रेटिंग देण्यात आलीे आहे. यामध्ये रियरला 48MP कॅमेरा देण्यात आला आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन OIS ला सपोर्ट करतो. याद्वारे, व्हीडिओ HDR स्वरूपात रेकॉर्ड केला जाऊ शकतो. तर, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 12MP कॅमेरा उपलब्ध आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी या नवीन आयफोनमध्ये ड्युअल सिम, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.3, रीडर मोड सह NFC, GPS, ग्लोनास, गॅलीलियो, QZSS आणि BeiDou चा समावेश करण्यात आला आहे.

iPhone 16e ची किंमत

Apple ने iPhone 16e ला भारतात 128GB, 256GB आणि 512GB अशा 3 स्टोरेज पर्यायांसह लाँच केले. या व्हेरिएंट्सच्या किंमत अनुक्रमे 59,900 रुपये, 69,900 रुपये आणि 89,900 रुपये इतकी आहे. या डिव्हाइसची प्री-बुकिंग 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल. तर, ग्राहक नवीन आयफोन 16ई ला 28 फेब्रुवारी 2025 पासून खरेदी करू शकतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *