Thomson Smart TV: JioTele OS वर आधारित पहिला Smart TV लाँच, किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी

Thomson Android TV 43″ QLED |थॉमसनने भारतात JioTele OS सह येणारा पहिला स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. हा टीव्ही 43-इंच QLED स्क्रीनसह उपलब्ध आहे. या टीव्हीमध्ये Jio द्वारा विकसित भारताची स्वतःची टेलिव्हिजन ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे. हा टीव्ही अलॉय स्टँडसह स्टायलिश डिझाइनसह येतो. हा बेझल-लेस टीव्ही आहे.
Thomson QLED TV ची किंमत आणि उपलब्धता
JioTele OS सह येणारा Thomson 43-इंच QLED टीव्ही 21 जानेवारी 2025 पासून ई-कॉमर्स साइट Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. हा जबरदस्त स्मार्ट टीव्ही 18,999 रुपये किंमतीत लाँच करण्यात आला आहे. टीव्ही खरेदीवर अतिरिक्त ऑफर्सचाही फायदा मिळणार आहे. कंपनी नवीन टीव्ही सोबत तीन महिन्यांसाठी JioHotstar आणि JioSaavn, तसेच एक महिन्यासाठी JioGames चे सबस्क्रिप्शन मोफत देत आहे.याशिवाय Swiggy वर 499 रुपये किमतीच्या फूड ऑर्डरवर 150 रुपयांची सूट मिळेल.
Thomson QLED TV ची वैशिष्ट्ये
- QLED डिस्प्ले: या टीव्हीमध्ये गडद कॉन्ट्रास्ट आणि वाइब्रंट रंग मिळतात, ज्यामुळे पिक्चर क्वालिटी अप्रतिम दिसते.
- JioTele OS इंटिग्रेशन: JioTele OS जलद इंटरफेस, AI-आधारित कंटेंट सर्च, सर्व लोकप्रिय अॅप्स आणि टीव्ही चॅनेल्सच्या सर्वात मोठ्या कलेक्शनसह उत्कृष्ट स्मार्ट टीव्ही अनुभव प्रदान करते.
- स्मार्ट कनेक्टिव्हिटी: या टीव्हीमध्ये व्हॉइस सर्च, स्क्रीन मिररिंग आणि HDMI तसेच USB पोर्टचा सपोर्ट उपलब्ध आहे.
- प्रीलोडेड अॅप्स: हा टीव्ही लोकप्रिय भारतीय आणि प्रादेशिक अॅप्स तसेच स्ट्रीमिंग सेवांसह प्रीलोडेड येतो.
- स्लीक डिझाइन: अलॉय स्टँडसह येणारा हा टीव्ही स्टायलिश दिसतो. तो बेजल-लेस असून त्याचा डिझाइनही खूपच स्लीम आहे.
थॉमसनचा हा टीव्ही 43-इंच QLED डिस्प्लेसह येतो, ज्यामध्ये 4K रिझोल्यूशन आणि 450 निट्स ब्राइटनेस आहे. ऑडिओसाठी 40W डॉल्बी ऑडिओ स्टिरिओ बॉक्स स्पीकर दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी HDMI 3 (ARC, CEC) आणि USB 2 पोर्ट्स उपलब्ध आहेत.
हा टीव्ही JioTele OS वर कार्य करतो आणि स्पीकर/हेडफोन, गेम कंट्रोलर, माऊस व कीबोर्डला सपोर्ट करतो. हा टीव्ही Amlogic प्रोसेसरवर चालतो, ज्यामध्ये 2GB RAM आणि 8GB स्टोरेज आहे. यामध्ये बिल्ट-इन व्हॉइस असिस्टंट देखील आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवाजाद्वारे टीव्ही नियंत्रित करू शकता.